जानेवारी २०१८
मराठी साहित्य विश्वात हाताच्या बोटावर मोजल्या जाणाऱ्या साहित्यिक मासिकांमध्ये एक ठळक नाव म्हणजे ‘साहित्य सूची’. गेली पस्तीस वर्षे हजारो वाचकांच्या पसंतीला उतरलेले असे हे मासिक. वाचकांची बदलती अभिरूची जपण्याचा आणि जोपासण्याचाही प्रयत्न करणारे हे एक रसिकप्रिय मासिक.