मार्च २०१७
मराठी साहित्य विश्वात हाताच्या बोटावर मोजल्या जाणाऱ्या साहित्यिक मासिकांमध्ये एक ठळक नाव म्हणजे ‘साहित्य सूची’. गेली पस्तीस वर्षे हजारो वाचकांच्या पसंतीला उतरलेले असे हे मासिक. वाचकांची बदलती अभिरूची जपण्याचा आणि जोपासण्याचाही प्रयत्न करणारे हे एक रसिकप्रिय मासिक.

दृष्टिकोन मार्च २०१७

काकदृष्टी

सेल्फी

‘सय’ आणि ‘बाई’

‘सय’ आणि ‘बाई’
कलाकारांची आत्मचरित्रे हा नेहमीच माझ्यासाठी एक अतिशय कुतुहलाचा विषय ठरलेला आहे. त्यांच्या मनात सुरू असलेल्या अथक ढवळाढवळीचे दूषित (पण वाजवी) नि:श्वास कलेतून, त्यांच्या कलाकृतींतून ते बाहेर सोडत असतात. त्यांचे पडसाद आपल्या मनावर उमटून त्यांचे हवे तसे अर्थ लावत आपण त्यांना आपली आयुष्ये समृद्ध करण्याची संधी देत असतो. कलेची उत्क्रांती ‘आपल्याकडे काय नाही हे उमजून आपण काय असायला हवे’ यापासून ‘आपल्याकडे काय आहे आणि ते घेऊन आपण कुठवर जायला हवे’ इथपर्यंत झाली असावी असे मी मानतो.

कुतुहलापोटी

कुतुहलापोटी
गरज ही जर शोधाची जननी असेल, तर कुतुहलास शोधाचा जनक अथवा मूळपुरुष म्हणावं लागेल. गरज-कुतूहल हे जोडपे आणि उत्सुकता-भीती हे त्यांचे नातलग बिचारे मानवाच्या प्रगतीकरिता सतत झटत असतात. कुतुहलाच्या बीजाने, गरजेपोटी, भविष्याबद्दल एकाच वेळी उत्सुक आणि किंचित घाबरलेल्या स्थितीमध्ये मानवाने हळूहळू तान्ह्या पावलांनी जी प्रगती केली आहे आणि करू पाहात आहे, त्याचे आपण सर्व साक्षीदार आहोतच.

पैसा

पैसा
‘अर्थ’ या शब्दात खूप व्यापक आणि जगाला व्यापून उरणारा अर्थ दडलेला आहे. अर्थ आणि अर्थकारणाशिवाय कुठलंच क्षेत्र पुढे सरकत नाही. पदोपदी, अगदी कुठेही गेलं तरी याचं मोल जाणवत राहातं. तेही इतकं पराकोटीचं की, त्यापुढे अमूल्य असलेल्या नातेसंबंधांना, भावविश्वाला आणि माणूसधर्मालाही याची काळी किनार सजवू पाहाते.

अगदी फॉन्टॅस्टिक

उकल डायरी, कट्टा आणि मी

उकल डायरी, कट्टा आणि मी
आत्ता नुकतंच तरुणाईने भारलेल्या एका नाटकाला जाण्याचा योग आला. त्या नाटकांतील पात्रांच्या तोंडी असणारी भाषा ‘बाप रे! काय हे शब्द... छी... असं कसं बोलू शकतात?’ या सदराखाली येऊ शकेल अशी होती. पण पूर्ण नाट्यगृहात एकालाही ते खटकलं नाही. इतकंच काय त्याच्या आधी, मध्यंतरात आणि शेवटीही चर्चा ऐकू येत होती, ती त्याच्या विचाराची, संहितेची. आणि मग ओघानेच काही पुस्तकांची नावे डोळ्यांसमोर आली ज्यात ‘अशी’ भाषा मोकळेपणाने सामोरी येते.

निसर्गचित्रे

निसर्गचित्रे
प्रातःकाळी जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी तिची क्षमा मागणारा, तिला देवत्व देणारा हा श्लोक आजही कित्येक घरात हात जोडून मनोभावे म्हणला जातो. सध्या जरी याचे प्रमाण कमी झाले असले तरी या श्लोकाचा अर्थ माहिती नाही किंवा हा श्लोक माहिती नाही असे अभावानेच आढळेल. अशा प्रकारच्या प्रातःकाळच्या प्रार्थना आपल्या भारतीय संस्कृतीच्या अविभाज्य घटक आहेत. हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे वर्षा गजेंद्रगडकर यांची नुकतीच वाचण्यात आलेली दोन पुस्तके. आपले सण आपली संस्कृती आणि निसर्गचित्रे.

युगवाणीचे तीन संपादक

युगवाणीचे तीन संपादक
असं जे म्हटलं जातं ते खरं आहे. हा संस्कृत श्लोक मनुष्याच्या जीवनातील साहित्याचे महत्त्व अधोरेखित करत आहे. उत्तम विचारच माणसाला प्रगतीकडे नेऊ शकतात. उत्तम विचार हे उत्तम साहित्यातून निर्माण होतात.

तर असं झालं

तर असं झालं
‘प्राज इंजिनिअर्स’ हे नाव उद्योग क्षेत्राला परिचित आहे. एखादा उद्योग यशस्वी झाला आणि खास करून तो मराठी माणसाने उभा केलेला असला तर त्याची दखल विशेषत्वाने घ्यावी लागते. खरं म्हणजे पुस्तकातून कितीही व्यवस्थापनाचे धडे शिकले तरीदेखील प्रत्यक्ष उद्योग-व्यवसाय प्रत्येक पावलावर काही नवं शिकवत असतो. नुकतंच प्रकाशित झालेलं ‘तर असं झालं’ हे प्राज कंपनीच्या प्रमोद चौधरी यांचं चरित्र म्हणजे ‘ई ळी ुहरीं ळी’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा भावानुवाद आहे.

संमेलन : उत्तरपूजा

संमेलन : उत्तरपूजा
आयुष्यात काही गोष्टी घडायचे योग यावे लागतात. त्यामुळंच डोंबिवली हे गाव आपल्याला अद्याप का घडलं नसावं, याचा आम्हाला विलक्षण खेद होत होता.

मुखवटे

मुखवटे
भाराभर लिहून कुणी प्रसिद्ध लेखक होईलच असे म्हणता येणार नाही. मात्र अगदी मोजके लिहूनही ज्यांनी वैचारिकतेमध्ये साहित्याची एक विशेष उंची गाठली अशा लेखकांमध्ये आनंद विनायक जातेगावकर यांचे स्थान खूप वरचे आहे हे निश्चित.

कॉकटेल कार्निवल

कॉकटेल कार्निवल
बरोबर एक वर्षापूर्वी याच महिन्यात चेतन जोशी यांच्या ‘लिटररी युअर्स’ या कादंबरीचा परिचय दिला होता. यावर्षी त्यांचा नवीन कथासंग्रह ‘कॉकटेल कार्निवल’ चा परिचय करून देण्याचा सुखद योग आला आहे. लेखक हा सर्वात जास्त त्याच्या लेखनातून समजतो असे मानले तर, चेतन जोशी हे एक प्रयोगशील लेखक आहेत. त्यांना नवनवीन प्रयोग करण्याची आवड आहे.

बेस्टसेलर्स आणि तत्त्वज्ञान

बेस्टसेलर्स आणि तत्त्वज्ञान
आर्किटेक्चरला असताना चौथ्या आणि पाचव्या वर्षात मिळून, आम्हाला थिसीस हा विषय असायचा. डिझाईन थिसीस आणि रिसर्च थिसीस असे दोन प्रकार असायचे. डिझाईनमधे विषयाचा अभ्यास करुन वर डिझाईनही करावं लागायचं, त्यामुळे आमच्यासारखे आळशी लोक रिसर्च थिसीस निवडायचे. मात्र ही काही कमी डोकेदुखी नसायची.

Making Masterpieces

Making  Masterpieces
क्वचितच वाचायला मिळणारे असे.. मराठी पुस्तक इतर भाषिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचे इंग्रजी भाषेतून लिहिलेले परीक्षण.

नवीन पुस्तके

मागील अंक