एप्रिल २०१७
मराठी साहित्य विश्वात हाताच्या बोटावर मोजल्या जाणाऱ्या साहित्यिक मासिकांमध्ये एक ठळक नाव म्हणजे ‘साहित्य सूची’. गेली पस्तीस वर्षे हजारो वाचकांच्या पसंतीला उतरलेले असे हे मासिक. वाचकांची बदलती अभिरूची जपण्याचा आणि जोपासण्याचाही प्रयत्न करणारे हे एक रसिकप्रिय मासिक.

दृष्टिकोन एप्रिल २०१७

काकदृष्टी

सेल्फी

जिगोलो आणि इतर कथा

जिगोलो आणि इतर कथा
आत्ताच तुझा ‘जिगोलो आणि इतर कथा’ हा नवा कथासंग्रह वाचला. कोणत्याही लेखकासाठी आपले नवे पुस्तक येणे ही अतिशय आनंदाची गोष्ट असते, त्यामुळे सर्वप्रथम तुझे अगदी मनापासून अभिनंदन. अगदी वेगळ्या विषयावरच्या कथांना हात घातल्याबद्दल तुझे विशेष अभिनंदन आणि कौतुक करायला हवे. आणि त्याचबरोबर नेटक्या निर्मितीबद्दल कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचेही अभिनंदन करायला हवे. ब्लर्बवर प्रवीण दवणे यांनी या कथासंग्रहाचे वर्णन ‘मराठी कथेची समृद्ध परंपरा धीटपणे नव्या वळणावर नेणारा कथासंग्रह’ असे केले आहे ते योग्यच आहे.

डोक्याचा भार

डोक्याचा भार
डेव्हिड अलबहारी यांचं नाव फिक्शन लेखक आणि अनुवादक म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांना काही समीक्षकांनी आजच्या काळातला ‘काफ्का’ असं म्हणून नावाजलेलं आहे. सर्बियन भाषेत लिहिणं हीच माझी खरी ओळख असल्याचं ते एका मुलाखतीत सांगतात.

निवडक बाबूराव अर्नाळकर

निवडक बाबूराव अर्नाळकर
रहस्य, त्याचा माग काढणं, त्यातली गूढता-थरार आणि महत्त्वाचं म्हणजे ‘आता पुढे काय होणार?’ हे मानवी मनाला असलेलं कुतूहल वर्षानुवर्षे माणसाला आकर्षित करत आलंय. त्यामुळे चित्रपट-मालिका-साहित्यावर त्या त्या विशिष्ट काळात काही ठराविक विषयांनी अधिराज्य गाजवलं तरी कुतुहलाचे, औत्सुक्याचे सगळे विषय चिरकाल चिरतरुण राहिले. ‘करमचंद’, ‘ब्योमकेश बक्षी’ किंवा ‘शेरलॉक होम्स’ या काल्पनिक व्यक्तिचित्रांनी जनमानसात स्थान मिळवलं.

द मॅड तिबेटियन

द मॅड तिबेटियन
केवळ एकशे तीस पानांचा ‘द मॅड तिबेटियन’ हा दीप्ती नवलचा कथासंग्रह आत्ताच वाचून संपवला. ‘कथा’, ‘चष्मेबद्दूर’, ‘साथ साथ’सारखे तिचे चित्रपट पाहिले होते. तिचा अतिशय साधा, बोलका आणि कमालीचा संवेदनशील चेहरा आणि अभिनय पाहून भारावून गेले होते. दोन-तीन वर्षांपूर्वी ‘लम्हा लम्हा’ हा तिचा कवितासंग्रह वाचला होता आणि आता ह्या पुस्तकानं पुन्हा दीप्ती भेटली आहे. अभिनेत्री, चित्रकार, कवयित्री, लेखिका दीप्ती नवल.

वामनाचे दुसरे पाऊल

तीन त्रिक दहा

तीन त्रिक दहा
माणसाच जगणं इतक्या विविधतेने आणि विसंगतीने भरलेलं आहे आणि जगण्याचा प्रवाह इतक्या भिन्न मार्गांवरुन, वळणांवरुन वाहात आलेला आहे की, माझ्यासारख्या एखाद्या जिवाने मला काही एक ‘दर्शन’ झालं, मला अमुक एक विचारधाराच श्रेष्ठ वाटते, अमुक एका ग्रंथात मला सगळी उत्तरं सापडली, मला काहीतरी ‘समजलं’ आहे असं काही म्हणणं फार गमतीशीर आहे. - उत्पल व.बा. (पुस्तकाच्या मनोगतातून)

धूळपेर

धूळपेर
रंगीबेरंगी पुस्तकाने भरलेल्या त्या कपाटात एका कृष्णधवल मुखपृष्ठाने माझे लक्ष वेधून घेतले. वेगवेगळ्या आकार आणि रंगांचा शृंगार केलेल्या पुस्तकांच्या गराड्यात आपल्या साधेपणाने उभे असलेले ते पुस्तक मला एखाद्या योग्याप्रमाणे भासले. चटकन उचलून हातात घेतल्यावर त्याच्या शीर्षकाकडे माझे लक्ष गेले आणि ‘धूळपेर‘ असे वैशिष्ठ्यपूर्ण नाव वाचून क्षण दोन क्षण मी विचार केला.

अभद्र

अभद्र
‘पेपर महाग झालाय, पण ऑनलाईन रायटिंग स्वस्त होत चाललंय’ असं परवाच माझा मित्र म्हणत होता. किती खरं आहे ना? तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपले विचार प्रकाशझोतात यायला मदत होत आहे. प्रत्यक्ष पुस्तकं विकत घेण्यापेक्षा त्यांच्या सॉफ्ट कॉपीज डाऊनलोड करून फुकटेगिरी जपण्याचे प्रकार सुरू झालेत. मराठी पुस्तकांच्या प्रती सहजी डाऊनलोड करता येत नसतील तरी इंग्रजी पुस्तके इंटरनेटवर आता सहजासहजी मिळतात.

बाल (साहित्य) लीला

बाल (साहित्य) लीला
आम्ही तसे हंगामी स्वरूपाचे गृहस्थ आहोत. म्हणजे हिवाळ्यात आम्हाला थंडी वाजते, उन्हाळ्यात आइस्क्रीम खावेसे वाटते अन् पावसाळ्यात सर्दी होते... आपण चारचौघांपेक्षा वेगळे आहोत, असं दाखवून लब्धप्रतिष्ठित होता येतं, पण माणूस म्हणून जगायचं राहून जातं. आम्हाला वाटतं, आधी चारचौघांसारखं तरी जगून बघू; मग आपल्याला काय वेगळं जमतंय का ते बघू. तर ते असो. मुद्दा असा की आम्ही ऋतुपालटाप्रमाणे बदलत जाणारे एक सामान्य संसारी सूक्ष्म जीव आहोत.

कवितेतल्या सखीवेळा

कवितेतल्या सखीवेळा
सखी, एक जीवाभावाचं नात... लोकसाहित्यापासून ते आजकालच्या चित्रपटगीतांपर्यंत सर्वांना भुरळ घालणारे.. त्याबद्दलच वाचा कवितेतल्या सखीवेळामध्ये

डेथ स्पीक्स - मृत्यू वाणी

डेथ स्पीक्स - मृत्यू वाणी
बगदादमध्ये एक व्यापारी आपल्या नोकराला बाजारातून काही सामान घेऊन येण्यासाठी पाठवतो. थोड्याच वेळात नोकर घाई घाईने परत येतो. तो भीतीने कापत असतो. तो सांगतो मालक आत्ता थोड्यावेळापूर्वी बाजारात गर्दीमध्ये एका स्त्रीचा मला जोरात धक्का लागला. मी मागे वळून पाहिले तर ती मृत्यू होती. तिने माझ्याकडे रोखून पाहिले आणि विचित्र भीतीदायक हातवारे केले. मला आता तुमचा घोडा द्या म्हणजे मी दूर निघून जातो. मी ‘समारा’ला जातो तिथे मृत्यू मला शोधू शकणार नाही. तो घोडा घेऊन भरधाव वेगाने निघून जातो.

नवीन पुस्तके

वाढदिवस शुभेच्छा

वर्धापन शुभेच्छा

स्मृती तयाची

मागील अंक