जुलै २०१७
मराठी साहित्य विश्वात हाताच्या बोटावर मोजल्या जाणाऱ्या साहित्यिक मासिकांमध्ये एक ठळक नाव म्हणजे ‘साहित्य सूची’. गेली पस्तीस वर्षे हजारो वाचकांच्या पसंतीला उतरलेले असे हे मासिक. वाचकांची बदलती अभिरूची जपण्याचा आणि जोपासण्याचाही प्रयत्न करणारे हे एक रसिकप्रिय मासिक.

मुलाखत

डॉ. गणेश देवी आदिम वंचिताक्षर

व्यंगचित्र

दृष्टिकोन

सेल्फी

तथाकथित

तथाकथित
मित्रा, सतीश तांबे हा आपला दोघांचाही एक भन्नाट मित्र आहे बघ. त्याच्या कथा म्हणजे रंजक, रसाळ आणि ऐसपैस निवेदनाचा वस्तुपाठ. तुझ्या ‘तथाकथित’ या नव्या कथासंग्रहाला तांबेबाबानं लिहिलेला ब्लर्ब देखील याला अपवाद नाही. मस्त लिहिलाय त्यानं तुझ्या या पुस्तकाचा ब्लर्ब.

वाचत सुटलो त्याची गोष्ट

वाचत सुटलो त्याची गोष्ट
गेल्या उण्यापुर्या सत्तर वर्षांमध्ये मी इंग्रजी-मराठी भाषेतलं, विविध विषयांमधलं उभं-आडवं बरंच काही वाचलं आहे. आजही वाचतो आहे. माझ्या आयुष्यातील वाचनप्रवास मी या पुस्तकात लिहिला आहे. आयुष्यभर वाचत असताना मला जे जे नवं आढळलं ते मी त्या त्या वेळी लिहीत गेलो. त्यातून पाचेक हजारांहून अधिक लेख मी लिहिले पण तरीही या वाचनप्रवासातलं खूप काही सांगण्याजोगं आहे.

पायी चालणार

पायी चालणार
कोणताही साहित्यप्रकार कोठून उगम पावतो? बादल सरकार या ज्येष्ठ नाटककाराच्या मते लेखन हे नुसत्या आयुष्याच्या अनुभवावरुन, जगण्यावरुन अथवा त्याचे तटस्थपणे अवलोकन करण्यातून उगम पावत नाही तर तो त्या दोन्हीच्या घर्षणाचा परिणाम असतो. लेखनाने जगण्याला घाट देता येतो. अर्थात त्यासाठी कोणतेही लेखन हे मनाच्या तळवटातून यायला हवे. कविता हा मला सर्वात विशुद्ध, निखळ साहित्यप्रकार वाटतो. योजना, प्रमाणं आणि व्याकरणाच्या सीमा उल्लंघून ती लिहिणार्याबरोबरच वाचणार्यालाही निखळ सुख देऊन जाते.

सायबरयुगातील संपादक

वैद्यकीय उपकरणांच्या जगात

वैद्यकीय उपकरणांच्या जगात
नवे युग, नवे तंत्र आणि नवे मंत्र अशी आज सर्वच क्षेत्रात स्थिती आहे, मग त्याला वैद्यकीय क्षेत्र तरी कसे अपवाद राहाणार. हे क्षेत्र तर अतिशय गुंतागुंतीचे शिवाय जीवन मरणाच्या प्रश्नांशी लढणारे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा जास्तीत जास्त वापर करणे हे यासाठी अगदी अपरिहार्य आहे. या दृष्टीने पाहाता डॉ. अविनाश भोंडवे यांचे ‘वैद्यकीय उपकरणांच्या जगात’ हे पुस्तक आपल्या सर्वांसाठी उपयुक्त आहे.

नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज

नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज
भारताच्या आजपर्यंतच्या इतिहासात आपण हे वेळोवेळी अनुभवले आहे की मूठभर लोक जर एका विशिष्ट ध्येयाने एकत्र येऊन काम करत असतील तर ते यशस्वी तर होतातच पण त्यांचे कार्य देखील इतरांना प्रेरणादायक ठरते. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी काही मोजक्याच मावळ्यांनिशी साकारलेले स्वराज्याचे स्वप्न.

सहावं महाभूत आणि मी!

सहावं महाभूत आणि मी!
आजपर्यंत आपण असं मानत होतो की आपल्याला आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पंचमहाभूतांचे वरदान आहे. पण आता ह्या पंचमहाभूतांत आणखी एका सहाव्या भुताची भर पडली आहे. त्या भुताची महती अशी की अल्पावधीतच त्याने मानवी जीवनात ‘न भूतो न भविष्यती‘ अशी क्रांती घडवून आणली आणि विशेष म्हणजे याची निर्मिती साक्षात् मानवाने केली. असे हे मानवनिर्मित सहावं महाभूत म्हणजे ‘संगणक’ होय. या संगणकाची गोष्ट आपल्याला ‘सहावं महाभूत आणि मी’ या पुस्तकात वाचायला मिळते.

तिरकीट धा

तिरकीट धा
अतिशय रंगलेल्या मैफिलीचा शेवट जवळ येतो, उत्कंठा वाढते, आनंदाचा परमोच्च क्षणही येतो तेव्हा तबल्याचे परिचित बोल आपल्या कानावर पडू लागतात. तिरकीट धा, तिरकीट धा, तिरकीट धा ......................! क्षणभर शांतता. टाळ्यांचा कडकडाट. हे दृश्य आपण कधी ना कधीतरी अनुभवलेच असेल. जोश, उत्साह आणि मन तृप्त करणारा हा अनुभव आपल्याला पुन्हा पुन्हा हवाहवासा वाटतो तो त्यातील ‘संगीता’च्या जादूने. या जादूचा आणि त्यातील माहीर जादुगारांचा पडद्यामागचा प्रवास ‘तिरकीट धा’ हे पुस्तक आपल्याला घडवते.

नवीन पुस्तके

वाढदिवस शुभेच्छा

वर्धापनदिन शुभेच्छा

स्मृती तयांची

मागील अंक