ऑगस्ट २०१७
मराठी साहित्य विश्वात हाताच्या बोटावर मोजल्या जाणाऱ्या साहित्यिक मासिकांमध्ये एक ठळक नाव म्हणजे ‘साहित्य सूची’. गेली पस्तीस वर्षे हजारो वाचकांच्या पसंतीला उतरलेले असे हे मासिक. वाचकांची बदलती अभिरूची जपण्याचा आणि जोपासण्याचाही प्रयत्न करणारे हे एक रसिकप्रिय मासिक.

दृष्टिकोन

व्यंगचित्र

मुलाखत

दोन प्रार्थना एक अन्वयार्थ

जागतिक भाषा सर्वेक्षण

मॅगझिनीतून सुटतेय गोळी

मॅगझिनीतून सुटतेय गोळी
‘मॅगझिनीतून सुटतेय गोळी’ या तुझ्या पहिल्याच कवितासंग्रहाला मानाचा ‘सुभाष भेंडे पुरस्कार’ मिळाल्याबद्दल सर्वप्रथम तुझे मनापासून अभिनंदन करतो. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या या पारितोषिकाच्या वितरणसमारंभात भाषण करताना मी म्हणालो होतो, की तुझ्या या कविता वाचून मला सर्वप्रथम आठवण झाली ती मागच्या शतकात आलेल्या नारायण सुर्वे यांच्या कवितेची. सुर्वे म्हणाले होते -

सेल्फी

झोप

झोप
सलग सतरावा दिवस. झोपेशिवायचा. नाही, मी निद्रानाशाबद्दल बोलत नाहीये. मला माहितेय निद्रानाश म्हणजे काय असतं ते. मला कॉलेजात असताना निद्रानाशासारखंच काहीतरी झालं होतं. हो, निद्रानाशासारखंच काहीतरी. म्हणजे नक्की काय हे मलाही नाही सांगता येणार, पण इतकं नक्की की तेव्हा मला जे काही झालं होतं ते अगदी असंच होतं आणि या ‘असंच’ला लोक निद्रानाश असं म्हणतात. कदाचित मला डॉक्टरने नेमकं काय ते सांगितलं असतं, पण मी कधीच डॉक्टरकडे गेले नाही.

वाटचाल फर्ग्युसनची

वाटचाल फर्ग्युसनची
मराठी साहित्यात इतकेच काय एकूणच भारतीय साहित्यात संस्थात्मक चरित्रे अभावानेच आढळतात. शैक्षणिक क्षेत्रातील संस्थांचा विचार करता आत्तापर्यंत ‘बखर मुंबई विद्यापीठाची’- डॉ. अरुण टिकेकर, ‘पुणे विद्यापीठाचा इतिहास’- डॉ. राजा दीक्षित, आणि ‘सिम्बायोसिस - एका संकल्पनेची चरित्रगाथा’ - डॉ. शां. ब. मुजुमदार अशी काही मोजकी चरित्रे सोडली तर बाकी फारशी दिसत नाहीत. यात बखर मुंबई विद्यापीठाची हे ललित अंगाने जाणारे लेखन सोडले तर इतर पुस्तके माहितीपर किंवा नोंदी स्वरूपातील आहेत.

सा एषा गणेशविद्या

सा एषा गणेशविद्या
जगातील सर्वात प्राचीन उपलब्ध वाङ्मय म्हणजे वेदवाङ्मय. ‘ऋग्वेद’ हा ज्ञात मानवी इतिहासातील पहिला भारतीय ग्रंथ आहे. ह्या वस्तुस्थितीचे नीट आकलन आपल्याला खरे म्हणजे झालेले नाही. आपल्या प्राचीन इतिहासात कोणती शास्त्रे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन होते ते भारतीयांनाच माहीत नाही. या विषयी अभ्यास करण्याऐवजी दुर्दैवाने भारतीय परंपरा कशी धार्मिक होती या एकाच बाजूची चर्चा अनेकदा होते.

छाप पाडणारी माणसं

कायमचे प्रश्न

कायमचे प्रश्न
‘काळपट-लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर धष्टपुष्ट गेंडा असून एका टोकदार भाल्याने त्याचा वेध घेतला आहे किंवा असे म्हणता येईल की सुस्तावलेल्या त्या धष्टपुष्ट गेंड्याला भाला टोचून जाग आणण्याचा हेतू आहे’. हे मी बोलत आहे ते रत्नाकर मतकरी यांच्या ‘कायमचे प्रश्न’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाबाबत. लाल काळपट रंग म्हणजे कदाचित एखाद्या युगाचा अस्त किंवा एखाद्या युगाची सुरुवात अशा अर्थानेही घेता येईल.

ब्राह्मणी स्वयंपाक

ब्राह्मणी स्वयंपाक
ब्राह्मणम् भोजनम् प्रियेत’ असे गमतीने म्हटले जात असले तरी ते खरेच आहे. मध्यंतरी व्हॉॅटसअॅपवरपण ‘एका ब्राह्मण सुगरणीचे मनोगत’ अशी पोस्ट आली होती. वाचून गंमत वाटली.

शोधा खोदा लिहा

शोधा खोदा लिहा
उत्कंठा, साहस आणि आश्चर्य यांचं मिश्रण असलेलं पुस्तक म्हणजे कोणता साहित्य प्रकार असेल असं वाटतं? रहस्यकथा, कादंबरी किंवा नाटक असंच ना, पण इथेच तर खरी मेख आहे. प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहणार्यांचा दृष्टिभ्रम हे पुस्तक दूर करतं. वरील तिन्ही गोष्टींचा समावेश असलेलं हे पुस्तक 1990 ते 2015 या काळातील वृत्तपत्रीय लेखांचं संपादन आहे. पत्रकारितेत वेगळी वाट चोखाळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि सामूहिक पद्धतीने लेख लिहिणार्या युनिक फीचर्स यांचं ‘शोधा खोदा लिहा’ हे पुस्तक आहे.

रिमझिमता एकांत

रिमझिमता एकांत
‘तिने हातात रंगांची पॅलेट घेतली आहे आणि अंतरंगातल्या स्वरांनिशी ती कुंचला फिरवतेय. रंगांच्या ओघळातून काही शब्द तयार होत आहेत आणि सारं वातावरण रंगीत, सुरेल, रसिलं बनलं आहे.’ हे स्वप्नरंजन नसून स्वानुभव आहे. जो मी घेतलाय आणि तुम्हीही घेऊ शकता. कवयित्री मंजिरी पाटील यांचा ‘रिमझिमता एकांत’ हा काव्यसंग्रह वाचताना रस, रंग, गंध यांची अनुभूती येऊ शकते.

पुस्तकांचं नकादु...

पुस्तकांचं नकादु...
पुस्तकांच्या दुकानात जायचे म्हटल्यावर आम्हाला भारी हसू येते. मनमज्जेच्या अनेक गोष्टी तिथं बघायला मिळतात. पुस्तकांव्यतिरिक्त किती तरी ज्ञानदायी प्रकार अनुभवता येतात. आम्ही किंचित लेखकू असल्यानं ग्रंथ आणि ग्रंथविक्रेते यांच्याशी आमचा ऋणानुबंध भलताच जुळला आहे. पुण्यनगरीत पुस्तकांच्या दुकानात जायचे म्हटले की ते साधेसुधे काम नसते. त्यासाठी बरीच पूर्वतयारी करावी लागते. साधारणतः कर्जाचे तीन हप्ते चुकल्यानंतर देणेकर्याला सामोरे जात आहोत असा भाव मनी आणावा लागतो.

स्टुडिओ : एक मैत्र

स्टुडिओ : एक मैत्र
‘स्टुडिओ’ हे पुस्तक मी पहिल्यांदा वाचलं तेव्हा चित्रकार सुभाष अवचट यांचं पुस्तक इतकीच माहिती मला होती. स्टुडिओ वाचलं तेव्हा चित्रकलेशी माझं अगदीच काही देणं घेणं नव्हतं, पण काही पुस्तकं तुमच्या नशिबात असतात आणि ती योग्य वेळी तुम्हाला कडकडून भेटतात. पुस्तकं देखील माणसांसारखी कडकडून भेटू शकतात हे अट्टल पुस्तक वाचकांना कळेलच. स्टुडिओ वाचून मी ‘झोर्बा द ग्रीक’ हा चित्रपट पहिला.

चित्रपट आणि साहित्य

चित्रपट आणि साहित्य
हल्ली असं क्वचित होतं की एखादी गोष्ट आपल्याकडे अॅमेझॉनवर मिळाली नाही आणि बाहेरून कोणालातरी सांगून मागवावी लागली. कमी प्रमाणात होतं, पण होतच नाही असंही नाही. हे जुन्या एडिशन्सबाबत अधिक शक्य असतं. आता आऊट ऑफ प्रिन्ट असलेली पुस्तकं आपल्याकडे मिळत तरी नाहीत किंवा प्रचंड महाग तरी मिळतात.

Small Screen - Big Scream

Small Screen -  Big Scream
When was the last time you felt suffocated while reading a book? Or the last time you wanted to hold your breath till you finished reading it?

नवीन पुस्तके

वाढदिवस शुभेच्छा

वर्धापनदिन शुभेच्छा

स्मृती तयांची

मागील अंक