जानेवारी २०१८
मराठी साहित्य विश्वात हाताच्या बोटावर मोजल्या जाणाऱ्या साहित्यिक मासिकांमध्ये एक ठळक नाव म्हणजे ‘साहित्य सूची’. गेली पस्तीस वर्षे हजारो वाचकांच्या पसंतीला उतरलेले असे हे मासिक. वाचकांची बदलती अभिरूची जपण्याचा आणि जोपासण्याचाही प्रयत्न करणारे हे एक रसिकप्रिय मासिक.

दृष्टीकोन

एक नवा वेगळा विक्रम

सेल्फी

बयो योजने! तू कविता लिहीत राहा

बयो योजने! तू कविता लिहीत राहा
काही कविता अशा असतात की, त्या कवितांवर कवितांइतकंच लिहिण्यासारखं असतं... पण कविता वाचून इतका सुन्न करणारा आनंद होतो की, काहीच लिहू नये असं वाटतं.

चित्रभास्कर

चित्रभास्कर
भास्कर चंदावरकर हे नाव ‘क्लासेस’ना माहीत झालं ते सामना, सर्वसाक्षी, भक्त पुंडलिक, गारंबीचा बापू या सिनेमांमुळे.

दायाद वारसा वाडात्रयीचा....

दायाद वारसा वाडात्रयीचा....
दोनच दिवसांपूर्वी ‘वाडा’ या नाट्यत्रयीचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. ऐंशीच्या दशकातलं नाटक उभं करणं आणि ते आत्ताच्या स्मार्ट फोनला, सोशल मीडियाला सरावलेल्या, इंग्रजाळलेल्या तरुण पिढीला ते तेवढंच आवडणं हा मला वाटतं त्या नाटकाच्या अभिजाततेचा परिणाम असावा. या प्रयोगापाठोपाठ हातात आलं ‘दायाद’ हे पुस्तक. एक तर महेश एलकुंचवारांचं लिखाण हा माझा वीक पॉइंट, त्यात नुकतीच भारावलेल्या मनःस्थितीत असताना या पुस्तकाचं हातात येणं हा एक दुर्मीळ योग होता.

ई-बुक्स मुद्रित पुस्तकांना मागं टाकणार?

नयनरम्य पहाटदेवता

नयनरम्य पहाटदेवता
देवानंद यांचं मुखपृष्ठ असलेल्या पुस्तकाचं शीर्षक ‘नयनरम्य पहाटदेवता’ असं पाहून आश्चर्य वाटलं. एक तर हा हिंदी चित्रपटसृष्टीतला कलाकार; त्याचं मराठीत पुस्तक; तेसुद्धा काव्यमय नाव असलेलं. यावरून हे देव आनंद यांचं चरित्र किंवा फिल्मी जगतातली त्यांची कारकिर्द सांगणारं पुस्तक नसेल असंच वाटतं होतं ...

सरदार पटेलांचं अभ्यासपूर्ण स्मरण

सरदार पटेलांचं अभ्यासपूर्ण स्मरण
गुजराती भाषेत चरित्रांची संख्या कमी आहे. वल्लभभाई पटेलांच्या जीवनावर ‘महामानव सरदार पटेल’ ही चरित्रात्मक कादंबरी लिहून दिनकर जोषींनी चरित्रांच्या दालनात भर घातली आहे. सुषमा शाळिग्राम यांनी या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे.

कथा अकलेच्या कायद्याची

कथा अकलेच्या कायद्याची
बौद्धिक संपदा, कॉपीराइट, ट्रेडमार्क, इंडस्ट्रिअल डिझाइन... ओळखीचे वाटतात ना हे सगळे शब्द? पेटंट हा शब्द तर आजकाल अगदी शाळेतल्या मुलांनाही माहीत असतो... पण पेटंट म्हणजे नेमकं काय, ते कुणाला आणि कधी मिळतं, कॉपीराइट आणि पेटंट यांच्यात फरक काय असे प्रश्न कुणी विचारले; तर...

टी-टाइम

टी-टाइम
एखादं फाइव्ह स्टार हॉटेल असो वा अमृततुल्य असो; नाहीतर एखादी छोटीशी टपरी; चहा पितापिता गप्पा मारत बसलेली मंडळी हे दृश्य आपल्याला अगदी सरावाचंच. इतका चहा हा आपल्या जवळचा, आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. आता हेच पाहा ना...

विदेशदर्शन

विदेशदर्शन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना न ओळखणारी व्यक्ती भारतात खचितच असेल. त्यांनी भारताचे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री आणि विदेशमंत्री ही महत्त्वाची पदे भूषवली. प्रागतिक विचारसरणीचे यशवंतराव महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती आहे. राजकारणपटू असूनही ते अतिशय रसिक होते..

मी स्त्री आहे म्हणून....

मी स्त्री आहे म्हणून....
मी स्त्री आहे म्हणून....भिन्नभिन्न पार्श्वभूमींतून; वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक स्तरांतून; वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितींतून; निरनिराळ्या भावनिक, मानसिक विचारसरणींतून लहानाच्या मोठ्या झालेल्या सात लेखिकांनी स्वतःचा घेतलेला शोध; सुरुवातीला बरेचदा नकळत... नंतरनंतर जाणीवपूर्वक....

निरोप

निरोप
हाऽय हाऽऽय! आम्ही आत्ता कुठं लेखकू म्हणून काहीसे प्रस्थापित होत होतो... तोच आमच्या या पेशाची भ्रूणहत्या व्हायची वेळ आली. ‘कुर्हाडीचा दांडा गोतास काळ’ ही म्हण आपल्याच बाबतीत कधी लागू होईल याचा विचारही आम्ही केला नव्हता... पण नेमकं तेच झालं. आमचं ‘ठोंब्या’पण पुनश्च सिद्ध झालं. आमच्या एका निर्णयानंच आमच्यातल्या लेखकाला नख लावलं. आता कुठल्याशा एखाद्या छापखान्यात प्रुफरीडर म्हणून नोकरी धरणं किंवा पीआरचा धंदा टाकणं एवढंच आमच्या हाती उरलं आहे.

लहानमोठी रहस्यं

लहानमोठी रहस्यं
सीक्वल्स आणि प्रीक्वल्स यांबद्दल लिहिताना एक अडचण असते; ती म्हणजे आधीच्या भागाचा काही संदर्भ देण्याची आवश्यकता पडू शकते आणि वाचकांनी जर हा आधीचा भाग वाचला नसेल (पण त्यांची वाचण्याची इच्छा असेल) तर त्यांच्यासाठी हा संदर्भ स्पॉयलर ठरू शकतो.

A Price On My Head?

A Price On My Head?
“Don’t write if you can live without it.” Gabriel Garcia Marquez had said. This brings up another question - What makes a writer put pen to paper or fingers to keyboard and toil away in isolation? Writing certainly isn’t as lucrative a profession as say, finance management or medicine. According to me a writer is part scientist and part mystic, experimenting with ideas and exploring new possibilities within the realm of imagination to be expressed through the magical medium of words.

नवीन पुस्तके

मागील अंक