आमच्या विषयी

संस्थापक
मोरेश्वर द. नांदुरकर
संपादक
योगेश मो. नांदुरकर
कार्यकारी संपादक
स्नेहा अवसरीकर
सल्लागार
वसंत मिरासदार
डॉ. चित्रलेखा पुरंदरे
विनायक देव
पारतंत्र्याचा इतिहास सांगणाऱ्या कहाण्या नेहमीच लिहिल्या गेल्या, पण पारतंत्र्यापूर्वीच्या काळानेही या भारतभूमीवर कर्तृत्वाच्या, कलास्नततेच्या, पराक्रमाच्या, धीराच्या उदात्त आठवणी लिहिल्या आहेत. इंग्रजी राजवटीने भारतावर सत्ता गाजवण्यापूर्वी जे अनेक राजे, संस्थानं आपली राज्य सांभाळत होते त्यांपैकी एक होता राजा उदयन. त्या कलास्नत, पराक्रमी राजाची कहाणी.

एकतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीची धामधूम, चारीबाजूंनी राजकीय नेत्यांच्या रणनीतिंच्या चर्चा आणि दुसरीकडे एप्रिल, मे, जूनसारख्या साहित्याच्या जगातला स्वस्थ, शांत काहीसा स्तब्ध माहोल... याकाळात प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्याही कमी आणि चर्चाही बेताच्या. या काळातही काही लक्षवेधी पुस्तकं प्रकाशित होतात. त्याच पुस्तकांच्या गठ्ठ्य़ातून हाताशी आलेलं एक वेगळं पुस्तक म्हणजे ‘उदयन.’ वीणावादनात रमलेला, तल्लीन झालेला राजा, गवाक्षातून सहज नजरेस पडावी अशी राजप्रासादाची चित्रे असं जुन्याच भासणाऱ्या शैलीतलं देविदास पेशवे यांचं मुखपृष्ठ असलेली तीनशे एकोणीस पानांची ही कादंबरी विहंग प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. ‘गीतांबरी’ ही भगवद्गीतेवरील वैशिष्ट्य़पूर्ण कादंबरी अर्जुनाच्या आयुष्याचे वेगळे पदर दाखवणारी ‘धनंजय’ अशा काही कादंबऱ्यानंतर राजेंद्र खेर यांनी ही ‘उदयन’ कादंबरी लिहिली आणि प्राचीन भारतीय इतिहासाच्या संशोधनात रुची असणाऱ्या ‘विहंग’ने प्रकाशित केली.
 

मागील अंक